PCMC : महिलांना मिळणाऱ्या कर सवलतीमध्ये महापालिकेने केली घट

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात 870 कोटी रुपयांचा (PCMC) विक्रमी कर संकलन नोंदवले होते. या आर्थिक वर्षात मात्र महापालिकेने मालमत्ता नोंदणी असलेल्या महिलांना देण्यात येणाऱ्या करावरील सवलत कमी केली आहे. महिलांना मालमत्तेवरील सामान्य करात 50 टक्के सूट होती, ती आता 30 टक्क्यांवर आणली आहे. तथापि, शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना 50 टक्के आणि माजी सैनिकांना 100 टक्के सूट देऊन  सामान्य करात सवलत पूर्वीप्रमाणेच कायम ठेवली आहे.

पीसीएमसीचे सहाय्यक महापालिका आयुक्त नीलेश देशमुख यांनी म्हंटले, की “आम्ही ज्या महिलांच्या नावावर मालमत्ता आहे अशा महिलांना दिल्या जाणाऱ्या सामान्य करातील सवलत 20 टक्क्यांनी कमी केली आहे. गेल्या 12 वर्षांपासून अशा महिलांना 50 टक्के कर सवलत मिळत होती. आता या आर्थिक वर्षापासून त्यांना 30 टक्के कर सवलत मिळेल.

Pune : दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आरोग्य शिबीर; शिबीरात 857 जणांची मोफत तपासणी

देशमुख म्हणाले की, माजी सैनिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग नागरिकांना दिलेली कर सवलत (PCMC) तशीच राहील. “तथापि, त्यांना मदतीचा दावा करण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार नाही. त्यांना आपोआप दिलासा मिळेल. ज्यांनी नुकतीच मालमत्ता विकत घेतली आहे त्यांनाच सवलत मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.