Talegaon Dabhade : माजी मंत्र्यांच्या आरोपावर आमदार सुनील शेळके यांचा टोला

पंचवीस लाख निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात विद्युत विषयक कामांसाठी जास्त रकमेची कामे मंजूर झालेली असताना आमदार शेळके यांनी कमी रकमेची कामे सांगितल्याचा आरोप (Talegaon Dabhade) माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केला. त्यावर आमदार सुनील शेळके यांनी माजीमंत्र्यांना टोला लगावला. 25 लाख रुपये निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधे नाक खुपसू नये असा टोला सुनील शेळके यांनी लगावला.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात विद्युत विभागाच्या अंतर्गत अनेक कामे मंजूर झाली आहेत. पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी सुचविल्यानुसार ही कामे होत असतात. गुरुवारी वडगाव मावळ येथे झालेल्या आढावा बैठकीत जी कामे मंजूर झाली आहेत. त्यासंबंधीची माहिती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.

PCMC : महिलांना मिळणाऱ्या कर सवलतीमध्ये महापालिकेने केली घट

स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. या मंजुर झालेल्या कामांबाबत मी माननीय पालकमंत्र्यांचे जाहीर आभार देखील व्यक्त केले आहेत.(Talegaon Dabhade) त्यामुळे पंचवीस लाख निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये.

राज्यात आणि केंद्रात तुमचे सरकार आहे. तुमचे असलेले राजकीय वजन आणि संबंध वापरुन जी दहा कामे तालुक्यातील सुचवली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करावा. किरकोळ कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालू नये, असेही शेळके यांनी म्हटले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.