PCMC : प्रबोधन पर्वाच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरीतून सूट

एमपीसी न्यूज – क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले (PCMC) व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाच्या अनुषंगाने कामकाजासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन प्रणाली व फेस रिडिंगमधून सवलत देण्यात येणार आहे. याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी आदेश जारी केला आहे.

Talegaon Dabhade : माजी मंत्र्यांच्या आरोपावर आमदार सुनील शेळके यांचा टोला

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार उपक्रमांतर्गत विचार प्रबोधनपर्वाचे 11 ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना 11 ते 15 एप्रिल या कालावधीत बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन प्रणाली व फेस रिडिंगमधून सवलत देण्यात येणार (PCMC) आहे. तसेच 12 एप्रिलला सफाई कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक थम्ब, फेस रिडिंग उपस्थितीमधून सवलत देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.