Walkathon : समर्पण दिवसानिम्मिताने वॅाकेथॅानचे आयोजन 

आयएमए पीसीबी, व पीसीएमसी रनरग्रुपतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज : आयएएम पीसीबी, व पीसीएमसी रनरग्रुप तर्फे (Walkathon) समर्पण दिवस साजरा करण्यात आला. या वर्षी 75 वर्षपूर्ती निमित्त आरोग्य सर्वाकारिता ही संकल्पना आहे. या निमित्ताने गणेश तलाव ते दुर्गा टेकडी व परत असे 5 किमीच्या वॅाकेथॅानचे आयोजन  करण्यात आले. 

समर्पण दिवसानिम्मिताने आयोजित वॅाकेथॅानमध्ये सुमारे 125 नागरिक व डॉक्टरांनी सहभागी घेतला होता.  यामध्ये आरोग्य विषयक घोषणांचे फलक हे विशेष आकर्षण होते. (Walkathon) वॅाकेथॅान नंतर सर्वांसाठी चहा व नाश्ताची सोय करण्यात आली होती.

डॉ सुशील मुथियान अध्यक्ष आयएमए पीसीबी  व डॉ अनिरुध्द टोणगावकर सचिव आयएमए पीसीबी या वेळी उपस्थित होते.
डॉ संजीव दात्ये यांनी या वॅाकेथॅानचे  उदघाटन केले.

PCMC : प्रबोधन पर्वाच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरीतून सूट

डॉ विकास मांडलेचा, डॉ सुहास लुंकडं, डॉ रितू लोखंडे, डॉ माया भालेराव, डॉ सुधीर भालेराव, डॉ दीपाली टोणगावकर डॉ ज्योती देकाते तसेच PCMC RUNNERS तर्फे हितेश गुप्ता, हुशान बिशन, दीपक उमरणकर व इतर आयएमए सदस्य यांनी विशेष सहकार्य केले. तसेच रक्तातील साखरेची तपासणी देखील या वेळी करण्यात आली.

दुपारी डॉक्टरांनी आपापल्या हॉस्पिटल मधील स्टाफचा अखंड रुग्ण सेवेकारिता सत्कार केला. संद्याकाळी 7 वा दीप प्रज्वलन करून नागरिकांच्या आरोग्याबद्दल सामाजिक बांधिलकीचा पुनःरूच्चार करण्यात आला. (Walkathon) अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन पूर्ण देशभर, आयएंमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद कुमार अगरवाल यांच्या आवाहनानुसार करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.