Pimpri : महापालिका कंपन्यांसोबत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार

एमपीसी न्यूज – कंपन्याच्या आस्थापनांसमवेत सामंजस्य करार करण्यास ( Pimpri ) महापालिका इच्छुक असून त्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सहकार्य करेल असे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

Pimpri : विकसित भारत संकल्प यात्रेतून 12 हजार नागरिकांना लाभ

पिंपरी-चिंचवड महापालिका औद्योगिक प्रशिक्षण विभाग, युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर, जीआयझेड आणि इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी व मुलींची कासारवाडी येथील इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल या ट्रेडच्या 55 विद्यार्थ्यांकरिता ओजेटी लिंक पीसीबी असेंबली ऑपरेटर हा 20 दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्राम इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील पाच औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.

त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सदर औद्योगिक आस्थापनांमध्ये समक्ष उपस्थित राहून अद्यावत प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतले. इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल कौन्सिल यांच्यामार्फत सदर प्रोग्राम बाबत असेसमेंट करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या व उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम पिंपरी येथील महापालिकेच्याऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपन्न झाला त्यावेळी अतिरिक्त आयुक्त बोलत होते.

कार्यक्रमास वोकेशनल ट्रेनिंग ॲडव्हायझर अमर पाटील जिआयझेड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक  आणि औद्योगिक आस्थापनांमधील वरिष्ठ अधिकारी  अभय ब्रह्मे,  अतुल धर्माधिकारी, यतीन बडगर,  विवेक मगर व प्रदीप जाधव युएसडीसीचे ट्रेनिंग को-ऑर्डिनेटर अनिल देशपांडे व लीगल ॲडव्हायझर सीमा शर्मा व आयटीआय चे गटनिदेशक प्रकाश घोडके, निदेशक सचिन तापकीर, उज्वला सातकर व बबीता गावंडे आदी उपस्थित होते.

जीआयझेड प्रोजेक्ट मॅनेजर केव्हीएल नरसिंहम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी जर्मनीमध्ये राबवण्यात येणाऱ्या डूवेल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग बाबत माहिती दिली तसेच कारखाने कंपनी यांनी आयटीआय समवेत एकत्र येऊन ओजेटी तसेच डीएसटी प्रोग्राम राबवणे आवश्यक असल्याबाबत नमूद केले.

तसेच भारतातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी हे आपल्या देशाचे, औद्योगिक क्षेत्रातील विकास कामाचे आणि देशाच्या औद्योगिक क्रांतीचे प्रतिनिधित्व करतात. आज पीसीबी असेंबली सारख्या गुंतागुंतीच्या विषयाचे प्रशिक्षण घेऊन आयटीआय मोरवाडी येथील मुले आणि आयटीआय कासारवाडी येथील मुलीही मोठ्या संख्येने प्राविण्याचे प्रमाणपत्र घेत आहेत हे पाहून केंद्रीय सरकार आणि जर्मन सरकार यांच्या कौशल्य विकासाचे स्वप्न सर्वार्थाने पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.

प्रास्ताविक प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले. युएसडीसी चे फाउंडर व प्रमूख बाळासाहेब झरेकर यांनी संपूर्ण ट्रेनिंग प्रोग्राम बाबत माहिती दिली तर विद्यार्थ्यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त करून अशा प्रकारचे अद्यावत प्रशिक्षण कंपनी आस्थापना मिळाल्याबाबत आभार व्यक्त केले तसेच आणखीनही अशा प्रकारचे अद्यावत प्रशिक्षण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

मंगेश मीठे, प्रादेशिक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया, यांनी ” तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला एलएलबी व्हावे लागेल, म्हणजेच एक चांगला लर्नर (नवीन ज्ञान मिळवणे) लिसनर (चांगले ज्ञान समजून घेणे) आणि बोल्ड (खंबीर) ही व्हावे लागेल, असा सल्ला याप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थीना दिला. हा संपूर्ण 20 दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्राम जीआयझेडच्या सहकार्याने राबविण्यात आला.विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून मान्यवरांचे आभार व्यक्त ( Pimpri ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.