Pimpri : उत्तम आरोग्यासाठी व्यायाम व आहाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता –  डॉ.कांचन दुरुगकर

एमपीसी न्यूज – कॅन्सर सारख्या आजारावर मात ( Pimpri) करण्यासाठी शारीरिक हालचाल व आहारावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे ,असा मोलाचा सल्ला डॉ. कांचन दुरुगकर यांनी विद्यार्थिनींना दिला.

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने विद्यार्थिनीसाठी आरोग्य विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी  डॉ.कांचन दुरुगकर बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. कांचन दुरुगकर, डॉ.चारुशीला गोरे, हिना मुलाणी नेचर अँड सिग्नेचर युनिव्हर्सल ट्रस्ट विभागप्रमुख ,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सचिन पवार,  प्राचार्य सदाशिव कांबळे, संयोजीका प्रा. रुपाली आगळे, प्रा. महालक्ष्मी शिरसाट, प्रा.सुधाकर बैसाने, प्रा.पवार ,सामाजिक कार्यकर्ता मा.गीता पाटील  उपस्थित होते.

Ravet : अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींचे मुंडन

डॉ.कांचन दुरुगकर पुढे बोलताना म्हणाले की, सध्याच्या भौतिक जगतामध्ये महिलांच्या ,विद्यार्थिनीच्या आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण झालेल्या असून निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी नियमित व्यायाम आणि पोषक आहाराची नितांत आवश्यकता आहे. तासंतास एकाच जागी बैठे काम करून कॅन्सर सारख्या अनेक दुर्धर आजारांना सामोरे जावे लागत आहे.या आजाराचे प्रमाण महिलांच्या एकूण संख्येच्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

याप्रसंगी डॉ.चारुशीला गोरे यांनी मार्गदर्शन करताना , दैनंदिन जीवनामध्ये दृकश्राव्य माध्यमापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील कामाबरोबर शारीरिक हालचाल व आहार या गोष्टींना प्राधान्य देऊन आपले जीवन सुखी आणि समृद्ध करावे असा मोलाचा सल्ला दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रुपाली आगळे,तसेच प्रास्ताविक प्राचार्य सदाशिव कांबळे आणि आभार प्रा. विभा ब्राह्मणकर ( Pimpri)  यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.