Ravet : अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींचे मुंडन

एमपीसी न्यूज –  रावेत मेट्रो इको पार्कची जागा ही बनावट ( Ravet) पंचनामा करून निवडणूक आयोग व सरकारची फसवणूक करून हस्तांतरित केली गेली. तसेच तेथे निवडणूक आयोग स्वतः अनधिकृत बांधकाम करत आहे. त्यासाठी अवैध वृक्षतोड करण्यात आल्याच्या निषेधार्थ पर्यावरण प्रेमींनी निषेध करत मुंडन केले.

Maharashtra : बारा बलुतेदारांसाठी संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना

रावेत मेट्रो इको पार्क गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. परिणामी तेथील झाडे पाण्याअभावी जळत आहेत. सर्व गोष्टीकडे पालिका, पोलीस व जिल्हाधिकारी कार्यालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पाण्याअभावी झाडे मारली जात आहेत व तेथील जैवविविधता नष्ट केली जात आहे.

ही झाडे जगविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले असून मेट्रो इको पार्क शनिवारपर्यंत सर्वासाठी खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, शनिवारी हे पार्क खुले न केल्याने रविवारी (दि.11) प्रशासनाचा निषेध मुंडन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून मेट्रो इको पार्कमधील झाडे पाण्याअभावी सुकत आहेत. डिसेंबरमध्ये पर्यावरणप्रेमींनी उद्यान विभागाकडे सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यात सुमारे 140 दुर्मिळ झाडे सुकल्याचा अहवाल देण्यात आला होता.

त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी झाडे वाचविण्यासाठी स्वखर्चाने 13 ते 14 टँकरने पाणी आत सोडले. तसेच झाडांना पाणी मिळावे व ती जगावीत यासाठी हे पार्क खुले करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती पर्यावरण प्रेमी प्रशांत राऊळ ( Ravet) यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.