Pimpri News: अरुण पवार यांचा संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्काराने यंदा वृक्ष लागवडी संदर्भात केलेले कार्य लक्षात घेऊन मराठवाडा जनविकास संघांचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार यांना गौरविण्यात आले.

सोलापूर येथे आयोजित 18 व्या अखिल भारतीय ग्रामीण साहित्य संमेलनात ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते अरुण पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्वागताध्यक्ष विजयकुमार ठुबे, साहित्यिक सुवर्णा पवार, सुहास जामगावकर, अभिनेत्री विनिता सोनावणे, परिषदेचे शहराध्यक्ष रमेश खाडे, फुलचंद नागटिळक आदी उपस्थित होते.

अरुण पवार यांनी आतापर्यंत 25 हजाराहून अधिक झाडे लावून त्यांचे टँकरद्वारे पाणी घालून संगोपन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावेळी बोलताना ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांनी पवार यांच्या कार्याचा गौरव केला. गोरे म्हणाले, समाजात फार थोडे लोक असे आहेत की आपला उद्योग व्यवसाय सांभाळत समाजाच्या कल्यानाचा विचार करतात. शासनाने कुठल्याही साहित्य संमेलनाला पैसे देऊ नयेत. परंतु साहित्यिकांना मोफत आरोग्य सुविधा व पेन्शन देण्यात यावी. सतशे ते दोन हजार रुपये पेन्शन म्हणून देऊ नयेत, तर माजी आमदारांना जेवढी पेन्शन देण्यात येते. तेवढी पेन्शन साहित्यिकांना देण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.