Pimpri News : पीसीएमसी कडून ओला व सुका कचरा एकत्र उचलणे बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक एप्रिल पासून ( Pimpri News ) ओला व सुका मिश्रित कचरा उचलायचे बंद करणार आहे. पीसीएमसी चे आयुक्त शेखर सिंग यांच्यानुसार हा निर्णय जास्त मनुष्यबळ लागू नये म्हणून घेतला आहे. कचरा व्यवस्थापन नियम 2016 प्रमाणे कचऱ्याचे वेगळीकरण हे कचरा गोळा करायच्या आधीच व्हावं असे म्हणणे आहे. आयुक्त शेखर सिंह यांचे म्हणणे आहे जे व्यावसायिक कारखाने कचऱ्याचा नियम पाळत नाहीत त्यांना दंड भरावे लागतील.

 

 

Pimpri News : धंदा बंद करण्याची धमकी देत गाडी वॉशिंग सेंटर चालकाला मारहाण

शेखर सिंह म्हणाले की, औद्योगिक कचरा घातक आणि घातक नसलेले असे दोन प्रकार आहेत. आम्ही घातक कचऱ्यावर प्रक्रिया करत नाही. ते रांजणगाव येथील एका प्लांटमध्ये एका खाजगी विक्रेत्याने उचलले जाते आणि तेच पुढे प्रक्रिया करता. औद्योगिक भागातील ओपन वेस्टमध्ये घरगुती कचरा मिसळला जातो ज्यामुळे मोशी कचरा प्रक्रिया युनिट मध्ये आगीचे अनेक अपघात होतात. त्यामुळे औद्योगिक घटकांना उगमस्थानी कचरा वेगळे करण्यास सांगितले आहे”.

 

 

स्वच्छ सर्वेक्षण 2023 चा एक भाग म्हणून नागरिकांना कचऱ्याचे वेगळीकरण करण्याबाबत शिक्षित करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आल्याचे पीसीएमसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. “काही निवासी आणि औद्योगिक भागात कचऱ्याचे योग्य प्रकारे विलगीकरण नाही. काही व्यक्ती आणि कंपन्या कचरा रस्त्यावर टाकतात. असे होऊ नये यासाठी कठोर कारवाई ( Pimpri News ) केली जाईल. विलगीकरण न केलेला कचरा उचलणे हा रहिवाशांना शिस्त लावण्याचा एक मार्ग आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.