Pimpri News : धंदा बंद करण्याची धमकी देत गाडी वॉशिंग सेंटर चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज –  गाडी वॉशींग सेटंरच्या मालकाला धंदा बंद कर (Pimpri News) म्हणत समर कामतेकर, भाजपचे अनुर मोरे व त्यांच्या 15 ते 16 साथीदारांनी जणांनी मारहाण केल्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हि घटना पिंपरी एमआयडीसी भागात डायनॅमीक्स कार केअर सेंटर येथे गुरुवारी (दि.23) दुपारी घडली आहे.

 

याप्रकरणी शिबु हरिदास (वय 49 रा.पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि.24) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भाजप युवा मोर्चाचे अनुप मोरे, सारंग कामतेकर यांचा मुलगा समर कामतेकर, एक महिला व इतर 15 ते 16 जण यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

 

PCMC News : शास्तीकरावरचा मूळ कर भरण्याची मुदत वाढविण्याची उद्योग सेने कडून मागणी

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर हा त्याची गाडी वॉशिंगसाठी घेऊन आला होता. यावेळी झालेल्या किरकोळ तक्रारीवरून समरने फिर्यादीला धंदा बंद कऱण्याची धमकी देत जमाव गोळा केला. यावेळी अनुप मोरे हि तेथे आले त्यांनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. बाऊन्सरकरवी हि फिर्यादीला मारहाण करत पुरुवा नष्ट कऱण्यासाठी ऑफीस मधील सीसीटीव्ही चे बटण दाबले आणि नुकसान केले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास (Pimpri News)  करत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.