Chikhli Crime News : हॉस्पिटल, नोकरी अशा अडचणी सांगत महिलेकडून उकळले तब्बल 38 लाख

एमपीसी न्यूज – सध्या तुमच्या भावनांचा वापर करून(Chikhli Crime News)  तुमचे बँक खाते  तुमच्या नकळत तुमच्या करवीच रिकामे करून घेतले जाते. असाच प्रकार चिखली येथील महिले सोबत घडला असून संबंधित महिलेकडून तब्बल 38 लाख रुपये आरोपीने उकळले आहेत. हा प्रकार एप्रिल 2020 ते आज अखऱेपर्यंत हा प्रकार घडला आहे.

याप्रकऱणी चिखली पोलीस ठाण्यात 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून समीर शाहीर पटेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pimpri News : पीसीएमसी कडून ओला व सुका कचरा एकत्र उचलणे बंद

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी आरोपीने व्हॉटसअप द्वारे मैत्री केली. ओलख वाढवत विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने नोकरीसाठी दो दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले, पुढे नोकरीसाठी, कॅन्सर उपचारासाठी, प्रवास खर्च वेळोवेळी खोटी कारणे देत फिर्यादी यांच्याकडून 38 लाख 48 हजार 609 रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतले. पैसे मागण्यासाठी फोन केला असता आरोपीने फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस (Chikhli Crime News) पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.