Pimpri News : कामावरून काढल्याच्या रागातून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – कामावरून काढले याच्या रागातून तरुणाने त्याच्या साथीदारासह (Pimpri News) शोरूममधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.6) सुस येथील महिंद्रा शोरूमच्या पार्कींगमध्ये घडला आहे.

याप्रकऱणी शिवम संतोष सोनी (वय 23 रा. वारजे माळवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून करण विजय जोशी (वय19 रा. सुतारवाडी), आदित्य पाईके, वैभव कोढार व एक अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : रिल्समुळे वाढतोय ब्रेन फॅानचा धोका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पुर्वी महिंद्रा शोरूमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. मात्र तो सतत कामावर येताना उशीर करत असल्याने त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले. गुरुवारी तो शोरूमच्या पार्कींगमध्ये आला असता फिर्यादी तेथे काम करत होते. यावेळी आरोपीने फिर्यादीला त्याच्या पगारीबाबत विचारले असता फिर्य़ादी यांनी ऑफीसमध्ये संपर्क करण्यास सांगितले.

या रागातून आरोपी व त्याच्या साथीदारांनी दगडाने फिर्यादीच्या डोक्यात मारत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथील सुरक्षा रक्षक गौरीशंकर रामकमल सोनी हा वाचविण्यासाठी आला असता त्यालाही दगडाने व लाकडी बांबूने मारण्यात आले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात (Pimpri News) गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.