Chikhli News : शरद नगरमध्ये भक्तीमय वातावरणात हनुमान जयंती साजरी

एमपीसी न्यूज – चिखली येथील शरद नगर परिसरातील वीर हनुमान मंदिराच्या ( Chikhli News) वतीने हनुमान जयंतीचे गुरुवारी (दि.6) आयोजन करण्यात आले होते. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

या सोहळ्यासाठी माजी नगरसेवक एकनाथ  पवार,माजी नगरसेविका मंगलाताई कदम,माजी नगरसेविका योगिताताई नागरगोजे,माजी नगरसेवक सुनील लोखंडे, विष्णुपंत नेवाळे,सचिन सानप,निलेश नेवाळे आदी उपस्थित होते.

मंदिराला केलेली विद्युत रोषणाई व मूर्तीला केलेली फुलांची आरास आकर्षक दिसत होते.

Pimpri News : कामावरून काढल्याच्या रागातून एकाला मारहाण

तसेच देवराम मेदनकर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ सुमारे 15 हजार भाविकांनी घेतला. रामनवमी ते वीर हनुमान जन्मोत्सव सालाबाद्रमाणे याही वर्षी भक्तिमय वातावरणात   पार पडला.

या काळात विविध महिला भजनी मंडळाचे कार्यक्रमाचे आयोजित केले होते.  रामनवमीच्या दिवशी ह भ प गणेश महाराज जगताप यांनी कीर्तनसेवा केली.  हनुमान जन्मोत्सवाचे  ह भ प अर्जुन महाराज फलके यांचे किर्तन झाले.  हनुमान जयंती या दिवसाचे औचित्य साधून भोसरीचे आमदार महेश  लांडगे यांच्या मातोश्री कै. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ   राजेश दिलीप साने यांनी मंदिरासाठी  वॉटर कुलरची ( Chikhli News) मशीन (पाणपोई) भेट दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.