Pimpri News: खंडणी मागणा-या एकाला पिंपरीत अटक

एमपीसी न्यूज – ‘मी तुला व तुझ्या शेठला जिवंत सोडणार नाही, माझी या भागात मोठी टोळी आहे. माझी या भागात दहशत आहे. तू आणि शेठने दरमहा दोन हजार रूपये हफ्ता दिला नाही तर गोडाऊन जाळून टाकीन,’ अशी धमकी दिली. त्याप्रकरणी 23 वर्षीय आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

 

कुणाल पप्पु इजगत (वय 23, रा. रेल्वेलाईन समोर, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत रामदास ज्ञानोबा पवार (वय 54, रा. तापकीर नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मी तुला व तुझ्या शेठला जिवंत सोडणार नाही, माझी या भागात मोठी टोळी आहे. माझी या भागात दहशत आहे. तू आणि शेठने दरमहा दोन हजार रूपये हफ्ता दिला नाही तर गोडाऊन जाळून टाकीन,’ अशी धमकी आरोपीने फिर्यादी यांना दिली. तसेच, शिवीगाळ करून गेट वरती लाथा मारून, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपी अटकेत असून, पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.