Pimpri News: दिव्यांग नागरिकांना पीएमपीएमएलचा मोफत पास

Pimpri News: दिव्यां नागरिकांना पीएमपीएमएलच्या मोफत पाससाठी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राहणा-या दिव्यांग नागरीक व एचआयव्ही बाधित नागरिकांना पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएलचे) मोफत पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने केले आहे.

पिंपरीतील कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन येथे 1 ते 30 एप्रिल दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांअतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात शहरातील दिव्यांग, एचआयव्ही बाधित नागरिकांना मोफस बस पास देण्यात येणार आहे. त्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. 30 एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

जुने पास धारकाकडील मी-कार्ड बंद झाल्यामुळे दिव्यांग व एचआयव्हीबाधित पासधारकांनी पासपोर्ट साईज दोन फोटो, मुळ मी-कार्ड जमा करणे, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, दिव्यांग प्रमाणपत्राची झेरॉक्स अर्जासोबत जोडावी. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दिव्यांग, एचआयव्हीबाधित नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.