Pimpri Corona Update: शहरात आज 15 नवीन रुग्णांची नोंद, 14 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात 15 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सलग सातव्या दिवशी कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.शहरातील 3 लाख 59 हजार 155 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या शहरात 72 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 62 रुग्ण गृहविलगीकरणात असून 10 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 7 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 294 आहेत.आज दिवसभरात 2 हजार 326 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 34 लाख 89 हजार 612 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.