Pimpri News: सीएनजी 1 एप्रिलपासून होणार स्वस्त, अजितदादांचा महागाईपासून दिलासा : संजोग वाघेरे‌

एमपीसी न्यूज : महागाईने कंबरडे मोडलेल्या देशवासीयांना दिलासा देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएनजीवर करकपात केली. येत्या 1 एप्रिलपासून दर कमी होणार आहेत.त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर संजोग वाघेरे‌ यांनी म्हटले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात वाघेरे‌ म्हणाले की, ”पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असून देशात महागाईचा भडका उडाला आहे. देशवासीयांना महागाईपासून दिलासा देण्याचा विचार केंद्रातील मोदी सरकार करताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरंडे मोडले आहे. या दरम्यान राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सीएनजीवरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी करण्याची घोषणा केली होती. याप्रमाणे सीएनजीवरील दर कमी केल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे”.

”एप्रिलपासून राज्यात सीएनजी स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे.सीएनजीचे कमी झालेले नवे दर येत्या 1 एप्रिलपासून लागू होतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एप्रिलपासून सीएनजी गॅस स्वस्त मिळणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्याने अनेक नागरिकांकडून वाहनांमध्ये, व्यावसायासाठी सीएनजीचा वापर केला जात आहे. सीएनजी गॅसची किंमत सध्या 66 रुपये इतकी आहे, या निर्णयामुळे ही किंमत आणखी कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे वाघेरे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.