Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने गरजू विद्यार्थिनींना सायकल भेट देत साजरी केली भाऊबीज

एमपीसी न्यूज – कोरोना काळात डोक्यावरील छत्र हरपले, आर्थिक आधार (Pune) गेला, संकटाचे अनेक डोंगर समोर उभे टाकले, अशा वेळी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली. बाल दिन व भाऊबीजचे औचित्य साधून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने बुधवारी (दि.15) या ब्राह्मण गरीब मुलीला रोजच्या प्रवासासाठी नवीन सायकल भेट देऊन खऱ्या अर्थाने भाऊबीज साजरी करण्यात आली.

या अनोख्या उपक्रमासाठी अनेक दानशूर हात पुढे आले. त्यांनी सायकल देण्याची जबाबदारी घेतली व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मार्फत ही मदत करण्यात आली.

Maharashtra : शासनमान्य ग्रंथालयांना योजनांच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

या छोटेखानी कार्यक्रमाला मंदार रेडे (जिल्हाध्यक्ष), केतकी कुलकर्णी (महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), प्रसाद जी गिजरे (प्रदेश उपाध्यक्ष), कमलेश जोशी (कोषाध्यक्ष), राजीव देशपांडे (शाखा अध्यक्ष), दत्तात्रय देशपांडे (धायरी) व नितीन जी फडणीस (नांदेड सिटी), सचिन वायकर (IT आघाडी अध्यक्ष), सरस्वती जोशी (युवती आघाडी अध्यक्ष) आदी उपस्थित (Pune) होते.

अनपेक्षितपणे व योग्य वेळी मिळालेल्या मदतीने उपस्थितांचे डोळे पाणावले व डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या विचारसरणीचे मनापासून आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.