Pimpri : महाभूमी पोर्टल वरून एका दिवसात दीड लाख जणांनी घेतला डिजिटल सातबारा

एमपीसी न्यूज – महसूल विभागाच्या महाभूमी पोर्टल वरून (Pimpri)  गुरुवारी एका दिवसात 1 लाख 48 हजार 726 जणांनी डिजिटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड करुन घेतला.

55  हजार 732  डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारे, 4  चार488 डिजिटल स्वाक्षरीत फेरफार आणि 6  हजार482 डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका (property card) डाऊनलोड करण्यात आले. एका दिवसात दोन लाख नागरिकांनी लाभ घेतला असून 36  लाख 61 हजार रुपयांचा महसूल नक्कल फी मधून शासनाला मिळाला. हा आज पर्यंतचा उच्चांक आहे .

Chinchwad : उघड्या दरवाजा वाटे घरातून 40 हजारांचा ऐवज चोरीला

महाभूमी पोर्टल सुरु झाल्या पासून या पोर्टल वरून 4 कोटी 37 लाख डिजिटल स्वाक्षरीत 7/12 , 1 कोटी 37 लाख डिजिटल स्वाक्षरीत 8अ , 13 लाख 58 हजार डिजिटल स्वाक्षरीत फेरफार व 8 लक्ष 16 हजार डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका (property card) डाऊनलोड करण्यात आले आहेत. त्यातून शासनाला 112  कोटी 61 लक्ष रुपये महासूल मिळाला आहे.

सध्या महसूल विभागाच्या या डिजिटल सुविधेचा वापर वाढत असून शेतकरी वर्ग देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याने नकला मिळण्यासाठी तलाठी किंवा अन्य अधिकारी यांचेवरील अवलंबित्व कमी झाले असल्याचे उप जिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी (Pimpri) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.