Pimpri : डॉ.डी.वाय.पाटील वैदयकीय महाविद्यालयाची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

एमपीसी न्यूज – जागतिक हृदय दिनानिमित्त ग्लेनमार्क फार्मा कंपनीने रक्तदाब तपासणी मोहीम घेतली. या मोहीमेत देशभरातील 37 संस्थाकडून सहभाग घेतला. पिंपरीतील डाॅ.डी.वाय.पाटील वैदकीय महाविद्यालयाने रविवारी (दि.24) 307 नागरिकांचा रक्तदाब तपासणी करुन उच्चांक गाठला आहे. या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद घेतली आहे, अशी माहिती डॉ..डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ.पी.डी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विद्यापीठीचे कुलगुरु डॉ.. एन.जे.पवार, डॉ. यशराज पाटील, डॉ. जे.एस.भावलकर, डॉ.. ए.एल.काकराणी, डॉ. मानसी हराळे उपस्थित होते. जागतिक हृदय दिनानिमित्त ग्लेनमार्क फार्मा कंपनी सीएसआर फंडातून विविध उपक्रम राबवित असते.

  • यंदा ग्लेनमार्क फार्मा कंपनीने देशभरात 41 पैकी 37 मेडीकल संस्थाची निवड केली. त्यामधून देशभरात नागरिकांना वाढलेला रक्तदाब तपासणी मोहीम घेतली. एका तासात कमीत कमी 200 व्यक्तीचे रक्तदाब तपासणीचे टार्गेट दिले.

पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील वैदकीय महाविद्यालयाने रविवारी (दि.24) सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत 307 नागरिकांचा रक्तदाब तपासणी करण्यात आली. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झाली आहे.

  • या मोहीमेत औषध विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. ए.एल.काकरानी, सहायक प्राध्यापक डॉ..मानसी हराळे यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला.

दरम्यान, डॉ.. काकरानी म्हणाले की, भारतात 23.5 पुरुष आणि 22.5 स्त्रिया असे रक्तदाबाचे प्रमाण आहे. त्यामुळे ग्लेनमार्क फार्मा कंपनीने रक्तदाब तपासणी मोहीम घेतली. या मोहीमेत देशभरात 37 सेंटरमधून तब्बल 11 हजार नागरिकांची रक्तदाब तपासणी पुर्ण केली. यावेळी कंपनीने व्हिडिओ आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावून ही मोहीम घेतली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.