Pune : मेघालयचे राज्यपाल तथागत राॅय यांच्या बडतर्फीसाठी धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज- काश्मीरच्या रहिवाशांवर आणि त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा असे असंवेदशील, असंवैधानिक विधान करणाऱ्या मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांचा निषेध करण्यासाठी, राजीनामा मागण्यासाठी ‘मतदार जागृती परिषद ‘ या मंचातर्फे आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. परिषदेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन दिले.

या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन ,जांबुवंत मनोहर ,संजय बालगुडे ,मुख्तार शेख ,सचिन पांडुळे, मयुरी शिंदे यांचा समावेश होता. ‘ देश भारतीय संविधानाच्या अनुसार चालणे अपेक्षित असताना मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांनी पुलवामा हल्ल्यानंतर कश्मिरी लोकांचा आणि त्यांच्या व्यवसायाचा बहिष्कार करावा अशा प्रकारचे असंवेदशील, असंवैधानिक विधान केले आह‌‌े .

भारतीय संविधानाने दिलेल्या पदावर आसनस्थ व्यक्तीने अशाप्रकारचे विधान करणे हे भारताच्या संविधानाला हरताळ फासण्याचे षडयंत्र मानले जाऊन त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई व्हावी ‘ असे या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.