Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे आयोजन

एमपीसी न्यूज – निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असिम आशीर्वादाने, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा मिशनचे चौथे सद्गुरू बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या ६५ व्या जयंती निमित्त शनिवार (दि.२३) स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तसेच संपूर्ण भारतभर एक लाख वृक्ष लावण्याची मोहीम देखील राबवण्यात आली.

पुणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये २६ सरकारी रुग्णालय, ४ सार्वजनिक उद्यान सुमारे ५००० स्वयंसेवकांनी स्वतः स्वच्छता दूत बनून स्वच्छ केली. पिंपरी-चिंचवडमधील सरकारी रुग्णालयामधील वार्डच्या बाहेरचे खुले क्षेत्र, पार्किंग क्षेत्र, आणि इतर परिसर स्वच्छ केला. त्याचप्रमाणे चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकानी पथ-नाट्या चे आयोजन करुन, लोकांसोबत संवाद साधून लोकांपर्यंत स्वच्छते बद्दल जनजागृती केली.

  • या स्वच्छता अभियानामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सरकारी रुग्णालय भोसरी, भोसरी सहल केंद्र, निगडी सरकारी रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान लोणावळा या ठिकाणी फाऊंडेशनच्या स्वयंसेवकानी स्वच्छता केली.

या अभियानास माजी आमदार विलास लांडे, पंडित आबा गवळी, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे तसेच संत निरंकारी मिशन चे सेक्टर प्रमुख अंगद जाधव (भोसरी विभाग) मिशनचे अनुयायी, सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.