Pimpri : जागतिक हृदय दिनानिमित्त मोफत CPR प्रशिक्षण

एमपीसी न्यूज –  भारतात दरवर्षी सुमारे 5-6 लाख (Pimpri ) लोक अचानक हृदयविकाराच्या मृत्यूमुळे (एससीडी) मरण पावतात, त्यापैकी बहुतांश 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे  हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग उद्भवतात.

Talegaon : तळेगाव येथे सामुदायीक 82 दिवसाची धर्मचक्र तप आराधना पूर्णहुती

सडन कार्डियाक अरेस्ट (SCA) पासून जगणे जगाच्या बहुतेक भागांमध्ये 10% पेक्षा कमी आहे हे सत्य अस्वीकार्य आहे.  सडन कार्डियाक अरेस्ट नंतर जिवंत राहण्यासाठी, बायस्टँडर कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) आणि बाह्य डिफिब्रिलेटर (AED) चा वापर वाढवणे गरजेचे आहे.

म्हणूनच मेडिकव्हर हॉस्पिटल्स “हार्ट सेव्हर्स: निरोगी (Pimpri ) जगासाठी CPR प्रशिक्षण” ही  सक्रियपणे एक देशव्यापी CPR प्रशिक्षण मोहीम सुरू करत आहे.ज्याचा उद्देश CPR च्या जीवन-रक्षक कौशल्यासह व्यक्तींना शिक्षित आणि सक्षम करणे आहे.

Pune : आर माधवन यांनी एफटीआयआय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, पहिल्याच दिवशी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

या मोहिमेच्या उपक्रमाबाबत, मेडिकव्हर हॉस्पिटल्स पुणेचे केंद्र प्रमुख डॉ संतोष साहू स्पष्ट करतात, “CPR – किंवा कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन ही हृदयाची धडधड थांबते तेव्हा केली जाणारी आपत्कालीन जीवन वाचवणारी प्रक्रिया आहे .

सीपीआरचे उद्दिष्ट छातीत यांत्रिकरित्या दाबून शरीराच्या महत्त्वपूर्ण अवयवांमध्ये रक्ताभिसरण चालू ठेवणे हे आहे. तात्काळ सीपीआर अचानक हृदयविकाराच्या झटक्यानंतर (Pimpri ) जगण्याची शक्यता 5 किंवा 10 पटीने सुधारू शकते.

“हार्ट सेव्हर्स: निरोगी जगासाठी सीपीआर प्रशिक्षण” या छत्राखाली, मेडीकव्हर हॉस्पिटल्स मोफत सीपीआर प्रशिक्षण सत्रांची मालिका आयोजित करत आहे , मेडीकव्हर हॉस्पिटल्सच्या देशव्यापी नेटवर्कच्या प्रमाणित तज्ञांकडून स्वयंसेवक प्रभावी सीपीआरचे कौशल्य शिकू शकतील .

मेडीकव्हर नेटवर्कच्या सर्व 25 रुग्णालयांमध्ये ही मोहीम सुरू केली जाईल . या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवकांना मेडिकव्हर हॉस्पिटल वेबसाइटवर एक समर्पित लिंक तयार (Pimpri ) केली आहे .

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहिती आणि नोंदणी तपशील मेडीकव्हरच्या या https://www.medicoverhospitals.in/cpr/ वेबसाइटवर मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.