Talegaon : तळेगाव येथे सामुदायीक 82 दिवसाची धर्मचक्र तप आराधना पूर्णहुती

एमपीसी न्यूज – श्री शांतिनाथ आदिनाथ श्वेतांबर मूर्ती पूजक (Talegaon) संकल संघ, तळेगाव स्टेशन यांच्यातर्फ सामूदायिक 82 दिवसाचे धर्मचक्र पूर्णहुती चे बुधवारी (दि.3) व गुरुवारी (दि.4) असे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुनिराज  प.पू. पियुषचंद्र विजयजी म.सा.आदि ठाणा,एंव मुनीराज हीरसागरजी, बालमुनी वीरभद्रजी, प.पू.सा. नमीवर्षाश्रीजी, म.सा.आदि ठाणा के निश्रा अशा 36 तपस्वी यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

या दोन दिवसांत मेहंदी,मंगल गीत,भजन कीर्तन व तळेगाव स्टेशन यांच्याद्वारे (Talegaon) उपस्थितांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. दोन्ही दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Pune : कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला ‘मिस्टर गे इंडिया 2023’

तसेच  बुधवारी सकाळी 10 वाजता 15 रथांद्वारे 36 तपस्वीं ची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक श्री आदिनाथ मंदिर ते शांतिनाथ मंदिर व शांतिनाथ मंदिर पासून पार्श्वप्रझालय अशी काढण्यात आली. तसेच तळेगाव स्टेशन श्री संकल संघ लाभार्थी परिवार तर्फे शाही पारणे करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन श्री तळेगाव स्टेशन सकल संघ,श्री नूतन ट्रस्ट मंडळ,श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ,श्री ऋषभ शांती विहार सेवक ग्रुप, श्री तळेगाव स्टेशन जैन महिला मंडळे या सर्वांच्या सहकार्याने (Talegaon) करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.