Pune : आर माधवन यांनी एफटीआयआय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, पहिल्याच दिवशी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

एमपीसी न्यूज – एफटीआयआयच्या (राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था) अध्यक्षपदी ( Pune) नियुक्ती झालेले अभिनेते आर. माधवन यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. तसेच विद्यार्थी, संस्थेतील विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात आदिवासींसह विविध समाजघटकांसाठी विनामूल्य लघु अभ्यासक्रम राबवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

Talegaon : तळेगाव येथे सामुदायीक 82 दिवसाची धर्मचक्र तप आराधना पूर्णहुती

आर. माधवन अभिनेता म्हणून तमीळ, तेलुगू, कन्नड, हिंदी चित्रपसृष्टीत दीर्घकाळ कार्यरत आहेत. शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित ‘रॉकेट्री’ या चित्रपटासाठी नुकताच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

त्यांची एफटीआयआय च्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर माधवन यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात संस्था, कामकाज, अभ्यासक्रम, सोयीसुविधांचा आढावा घेतला.

नियामक परिषद, विद्या परिषद, स्थायी वित्त समितीचे अध्यक्ष म्हणून बैठका घेतल्या. त्यात त्यांनी अभ्यासक्रमांची रचना समजून घेण्यासाठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी विभागाच्या प्रमुखांशी संवाद साधला. तर विद्यार्थ्यांच्या अपेक्षा ही जाणून घेतल्या.

आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी ओपन लर्निंग वर्टिकल, सेंटर फॉर ओपन लर्निंग अंतर्गत 450 हून अधिक लघु अभ्यासक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल आणि आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण भारतभर शुल्काशिवाय छोटे अभ्यासक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी FTII ची प्रशंसा केली.

चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी लहान मुलांसारखा उत्साह टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण उत्साहच सर्जनशीलता आणि उत्कृष्टतेसाठी ची प्रेरक शक्ती असल्याचे मत माधवन ( Pune)  यांनी मांडले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.