PCMC : महापालिकेने पाच वर्षात राज्य सरकारला दिले 470 कोटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ( PCMC) राज्य शासनाला रोजगार हमी कर, शिक्षण कर व फ्लोअरेज कर यासारख्या तीन करातून दरवर्षी मोठी रक्कम जमा केली जाते. महापालिकेने गेल्या 5 वर्षांत तब्बल 470 कोटी 34 लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा केले आहेत. शहरातील मालमत्ता धारकांकडून ही रक्कम पालिका वसूल करत असते. शहरातील निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व मोकळ्या जागा मालकांकडून दरवर्षी कोट्यवधींचा मिळकतकर गोळा केला जातो.

शहरात 6 लाख 2 हजार मिळकती आहे. 2022-23 या आर्थिक ( PCMC) वर्षात महापालिकेच्या तिजोरीत 816 कोटी रुपये जमा झाले होते. मिळकतकर बिलात सामान्य कर हा केवळ घर व मालमत्तेवरील कर आहे.

उर्वरित इतर कर हे पाणीपुरवठा, आरोग्य, ड्रेनेज, उद्यान, स्थापत्य या विभागाचे तसेच, राज्य शासनाचे कर आहेत. रोजगार हमी कर, शिक्षण कर व फ्लोअरेज कर हे तीन कर राज्य शासनाचे आहेत. तो कर नागरिकांकडून वसूल करून शासनाला जमा केला जात असतो.

Pimpri : जागतिक हृदय दिनानिमित्त मोफत CPR प्रशिक्षण

मिळकत करातून गेल्या वर्षी एकूण 816 कोटी रुपये जमा झाले होते. त्यापैकी रोजगार हमी कर 12 कोटी 88 लाख आहे. शिक्षण कर 129 कोटी 87 लाख आणि फ्लोरेज कर 8 कोटी 52 लाख असे एकूण 151 कोटी 27 लाख रुपये राज्य शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले. सरासरी दरवर्षी 100 कोटीपेक्षा अधिकची रक्कम महापालिका राज्य शासनाला देत आहे.

महापालिका दरवर्षी मिळकतकर वसूल करते. मिळकतकराच्या ( PCMC) बिलात प्रशासकीय सेवाशुल्क, सामान्यकर, वृक्ष उपकर, मलप्रवाह सुविधा लाभकर, पाणीपुरवठा लाभकर, रस्ता कर, विशेष साफसफाई कर, शिक्षण कर, रोजगार हमी कर, फ्लोअरेज कर, जप्ती वॉरंट फी, मनपा कर विलंब दंड, शिक्षण कर विलंब दंड, रोजगार हमी कर विलंब दंड, फ्लोअरेज कर, विलंब दंड, उपयोगकर्ता शुल्क असा विविध प्रकारचे 17 कर व दंडाचा समावेश आहे.

हे कर महापालिका दरवर्षी वसूल करते. शहरातील निवासी, व्यावसायिक मालमत्तांकडून पालिका कचरा गोळा करते. त्यामुळे यंदाच्या वर्षापासून दर महिन्यास घरटी 60 रुपये व व्यावसायिक मालमत्ता धारकांकडून दरमहा 90 ते 150 रुपये उपयोगकर्ता शुल्क म्हणून जमा करण्यास सुरुवात केली आहे. वर्षभराची रक्कम मिळकतकर बिलात समाविष्ट केली असून आरोग्य विभागाला ही रक्कम देण्यात ( PCMC) येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.