Pimpri : वाकड, पिंपळेसौदागर येथील रस्त्यांचे करणार डांबरीकरण 

डांबरीकरणासह स्थापत्य विषयक 15  कोटीच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील वाकड, ताथडवडे, पिंपळेसौदागर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. यासह दोन्ही प्रभागातील स्थापत्य विषयक कामे केली जाणार आहेत.  डांबरीकरणासह स्थापत्य विषयक कामाच्या सुमारे 15  कोटीच्या निविदा महापालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. 

भाजपच्या पहिल्या स्थायी समितीने समाविष्ट गावांसह शहरातील विविध भागाच्या  रस्त्यांचा विकास, रस्त्यांवर डांबरीकरण, मजबुतीकरण, रस्ते विकसित करणे यावर सुमारे 500 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत.  आता वाकड, ताथडवडे, पुनावळे, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर येथील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. तसेच स्थापत्य विषयक कामे केली जाणार आहेत.  त्यासाठी सुमारे 15 कोटीच्या कामांची निविदा प्रसिद्ध केली आहे.

प्रभाग क्रमांक 25 वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याचे डांबरीकरण (निविदा रक्कम 54 लाख 85 हजार 299), वाकड परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण ( 1 कोटी 24 लाख), पुनावळे व प्रभागातील इतर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे (62 लाख 32 हजार 266), ताथवडे व प्रभागातील इतर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे (63 लाख 31 हजार 861), वाकड, ताथवडे, पुनावळे येथे विविध कंपन्यामार्फत खोदण्यात आलेले चर दुरुस्त करणे ( निविदा रक्कम 93 लाख 44 हजार 637) , पुनावळे, ताथवडे येथील स्मशानभुमीची दुरुस्तीची कामे (8 लाख 61 हजार),

प्रभाग क्रमांक 28 मध्ये ठिकठिकाणी हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे (62 लाख 32 हजार 266), रहाटणी व पिंपळेसौदागर परिसरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे (1 कोटी 37 लाख), प्रभाग क्रमांक 29 पिंपळेगुरव येथील ठिकठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे (56 लाख 10 हजार),

पिंपळेसौदागर येथील पवना नदीकाठी कचरा संकलन केंद्र विकसित करणे (62 लाख 33 हजार 701), पिंपळेगुरवमधील स्मशानभूमी येथील उर्वरित स्थापत्य विषयक कामे (67 लाख 31 हजार), पिंपळेनिलख, रक्षक चौक येथील बीआरटीएस रस्त्यालगत मिलिटरी हद्दीत भारताचा राष्ट्रध्वज उभारणे व स्थापत्यविषयक कामे करणे (24 लाख 82 हजार), प्रभाग क्रमांक 26 महापालिका शाळेची सुधारणा करुन स्थापत्य विषयक कामे करणे (24 लाख 82 हजार),  पिंपळेगुरव मधील गुप्ता चाळ व आदर्शनगर परिसरात स्थापत्य विषयक कामे (12 लाख 41 हजार), मोरया पार्क, ओंकार कॉलनी, इतर परिसरातील पेव्हींग ब्लॉक आणि स्थापत्य विषयक कामे (12 लाख 42 हजार),

भीमाशंकरनगर, अभंग कॉलनी व इतर परिसरातील स्टॉर्म वाटर लाईनची, स्थापत्य कामे (12 लाख 41 हजार), भाऊनगर, शिवनेरी कॉलनीसह परिसरातील पेव्हींग ब्लॉक बसविणे (12 लाख 43 हजार), वैदुवस्तीमध्ये संडास ब्लॉक बांधणे (12 लाख 40 हजार), तुळजाभवानीनगर, साईनाथनगर, गणेशनगर परिसरातील पेव्ही ब्लॉक व स्टॉर्म वॉटर लाईनची स्थापत्य विषयक कामे ( 12 लाख 42 हजार),महापालिका शाळा इमारतीची रंगरंगोटी करणे व स्थापत्य विषयक कामे (12 लाख 40 हजार),

पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये फर्निचर आणि स्थापत्य विषयक कामे करणे (26 लाख 56 हजार) आणि मिलिंदनगर येथे सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत कमान उभारणे या कामाची (7 लाख 19 हजार) रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.