Pimpri : शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले एकवीरा देवीचे दर्शन

एमपीसी न्यूज  – मावळ लोकसभा मतदारसंघाचे  (Pimpri)  शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) कार्ला येथील एकवीरा गडावर जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतले.

रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. आई एकविरा देवीच्या ( Pimpri )मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज चौथ्या दिवशी कार्यकर्त्यांसह गडावर जात देवीचे दर्शन घेतले.

Worldcup 2023 : दक्षिण आफ्रिका पुन्हा चोकर्स; नेदरलँड कडून 38 धावांनी पराभव

त्यांच्यासोबत शिवसेना सचिव वैभव थोरात, भाजपा युवा मोर्चा सचिव जितेंद्र बोत्रे, मावळ जिल्हाप्रमुख शरद हुलावळे,  तालुका प्रमुख राजुभाऊ खांडभोर, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख निलेश तरस, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ता केदारी, विशाल हुलावळे, राजेंद्र तरस, एकवीरा देवस्थान विश्वस्त नवनाथ देशमुख,  कार्ला पोलीस पाटील अनिल पडवड, शिवसेना संघटक अंकुश देशमुख , नितीन देशमुख आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला (लोणावळा) गडावरील आई एकविरा देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल जात आहे. देवीचे मंदिर व चौघड्याला आकर्षक फुलांचे डेकोरेशन करण्यात आले असून गड परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

राज्याच्या कानाकोप-यातून देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गडावर येत आहेत. भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे. गोंधळ करु नये, उत्सवाला गालबोट लागेल असे कोणी वागू नये. शांतता पाळावी” असे आवाहनही त्यांनी भाविकांना केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.