Pune : भारती विद्यापीठात ‘मशीन लर्निंग’ वरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी (Pune) महाविद्यालयातर्फे रिसर्च ट्रेंड्स अँड मेथडॉलॉजीज इन मशीन लर्निंग‘ वरील 7 दिवसांच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. टेक महिंद्रा कंपनीचे सहउपाध्यक्ष कांचन भोंडे,चीफ इनोव्हेशन ऑफिसर निखिल मल्होत्रा यांच्या हस्ते उदघाटन झाले. भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी,अधिष्ठाता डॉ.शशांक जोशी,डॉ.संदीप वांजळे,डॉ.रोहिणी जाधव,प्रा.प्रशांत चव्हाण उपस्थित होते.

कांचन भोंडे म्हणाल्या,’नवीन अद्ययावत ज्ञान घेणे प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी (Pune) जुनी मते,धारणा सर्व बाजूला ठेवण्याची गरज नाही. मात्र, जुन्या धारणा आणि ज्ञान काळाच्या कसोटीवर तपासात पुढे जावे लागणार आहे. नव्या गोष्टी स्वीकारण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.

निखिल मल्होत्रा म्हणाले,’रिडींग (वाचन) आणि कोडिंग या दोन्ही गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्र एकमेकांना पूरक असून एकमेकांची बलस्थाने समजून घेऊन नवसंकल्पनांवर एकत्रित काम केले पाहिजे.

प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी म्हणाल्या,’नव्या संशोधनाची,घडामोडींची माहिती घेवून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सारखे उपक्रम उपयुक्त ठरतात. उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने त्यासाठी संवाद आणि संपर्क (Pune) ठेवला पाहिजे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.