Pimpri : पवना, मुळा व इंद्रायणीतील जलप्रदूषण रोखा, अन्यथा…

एमपीसी न्यूज – शहरात दररोज सुमारे 300 दशलक्ष लीटर सांडपाण्यावर(Pimpri) प्रक्रिया होत असून, उर्वरित 59 दशलक्ष सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे गांभीयार्ने लक्ष घालून तात्काळ जलप्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण (Pimpri)संघटनेचे पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे उपप्रादेशिक अधिकारी मंचक जाधव यांची भेट घेतली. यात नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सूरज बाबर, शिवसैनिक गणेश बाबर, योगेश राऊत, स्वप्नील शेटे, कौस्तुभ देशपांडे, परेश पटेल आदींचा समावेश होता. या वेळी अधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले.

Chinchwad : दिव्यांग मतदारांच्या नोंदणीसाठी चिंचवडमध्ये उद्या विशेष मोहिम

या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात 595 दशलक्ष लिटर इतके पाणी जलसंपदा विभागाकडून घेण्यात येते. त्यापैकी सरासरी 80 टक्के म्हणजेच 359 दशलक्ष लीटर सांडपाणी शहरातील आहे. सद्यःस्थितीत एकूण 363 दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे 16 मैला शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. मात्र, केवळ 300 दशलक्ष लीटर इतक्याच सांडपाण्यावर प्रक्रिया होत असून, उर्वरित 59 दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदीच्या पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात येत असून, जलप्रदूषणातही भर पडत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या जल प्रदूषणाकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल. शिवाय, न्यायालयामध्ये जनहित याचिका व हरित लवादाकडेही तक्रार केली जाईल, असे शिष्टमंडळाने नमूद केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.