PCMC : महापालिकेचे उपायुक्त सुभाष इंगळे यांची मंत्रालयात बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC)आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांची मुंबईत मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत साडे तीन वर्षांपूर्वी उपायुक्त सुभाष इंगळे महापालिकेत रुजू झाले होते.

त्यांनी महापालिका प्रशासनाचे उपायुक्त म्हणून (PCMC)त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतर त्यांच्याकडे उद्यान विभागाची जबाबदारी सोपवली होती. आता आकाश चिन्ह व परवाना विभागाची जबाबदारी होती.

Pune : अन् गोष्टी सांगण्यात रमले आजी आजोबा…

शुक्रवारी त्यांची बदली झाली आहे. राज्य सरकारच्या उपसचिव पदावर त्यांची पदोन्नतीने बदली झाली. आता त्यांची पदस्थापना ग्रामविकास विभागाच्‍या उपसचिवपदी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.