Pimpri : शिक्षकांसाठी अध्ययन कार्यशाळा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शाळांच्या शिक्षकांसाठी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येक विषयाच्या पाठातून काय अध्ययन निष्पत्ती होणे आवश्‍यक आहे, या दृष्टिकोनातून महापालिका शाळेतील शिक्षकांसाठी अध्ययन निष्पत्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळा आकुर्डी व पिंपरी शहर साधन केंद्र येथे घेण्यात आली. यावेळी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी डॉ. राजेश बनकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेला पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळेतील 140 शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेत मान्यवरांनी प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी इयत्तानिहाय अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्य, क्षमता निश्‍चित केली आहे. तसेच, कार्यशाळेत अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्‍ननिर्मिती कशा पद्धतीने करण्यात यावी, या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.