Pimpri : …तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेलमध्ये जातील – अॅड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – राजकारणातील चोरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पकडत(Pimpri)आहेत. पण,  पकडल्यावर ती प्रकरणे पूर्णत्वाकडे नेली जात नाहीत. काही वर्षे जेलमध्ये ठेवून भीतीचे वातावरण निर्माण केले जात असून हे मानसिकतेवर आघात करण्याचे धोरण आहे.  सत्ता बदल झाल्यावर या न्यायाप्रमाणेच मोदी हे सुद्धा जेलमध्ये जावू शकतात, असे भाष्य वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

पिंपरीत वडार समाजाच्या मेळावा पार पडला. मेळावा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना  अॅड.  आंबेडकर पुढे म्हणाले की अजित पवार यांनी  मोदी, शहा यांना  उल्लू बनविले. देशभरात उरलेले सर्वजण घाबरतात. पण, पवारांनी या दोघांनाही उल्लू बनविले. कोणाचे कधी, कुठे मुख्यमंत्रीपद चिटकेल त्यावर अजित पवार भाजपमध्ये जातील की नाही हे अवलंबून राहील.

Marathi Language : मराठी भाषा धोरणाचा मसुदा शासनास सादर – मंत्री दीपक केसरकर

पोस्कोचा गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला तत्काळ अटक होते. पण, गुन्हा दाखल होऊनही भाजप खासदार, कुस्ती संघाचे (Pimpri) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना अटक झाली नाही, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.