Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या ‘टेकमंथन -2023’ मध्ये 32 आस्थापनांशी सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – औद्योगिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्था (Talegaon Dabhade) यांच्यातील समन्वय वाढविण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकीच्या संगणक विभागामार्फत ‘टेकमंथन -2023’ चे नुकतेच आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे कौशल्य हे औदयोगिक जगताशी जोडण्याचे काम यातून जास्त प्रमाणात होईल हे या टेकमंथनचे उद्दिष्ट होते. यामध्ये विविध क्षेत्रातील 32 अस्थापनांशी सामंजस्य करार करण्यात आले.

या कार्यक्रमास जी.एन सोल्युशनचे व्यवस्थापकीय संचालक महेश कुलकर्णी, इंडेक्स इंजिनचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जहागीरदार, डि.जी.एम महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडचे टी मनोजकुमार,मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेडचे संचालक गणेश खामगल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री  संजय भेगडे, खजिनदार राजेश म्हस्के,सहसचिव नंदकुमार शेलार, विश्वस्त महेशभाई शहा, उद्योजक दादासाहेब उऱ्हे, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, एनसीईआरच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, प्रा. मुजाईद  शेख, डॉ. नितीन धवस, डॉ. सतिश  मोरे, डॉ. सौरभ सावजी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नाशिक,औरंगाबाद,भोसरी, पुणे,आंबी,उर्से या औदयोगिक क्षेत्रातील विविध आस्थापनातील व्यवस्थापक उपस्थित होते. त्याप्रसंगी ३२ आस्थापनांशी सामंजस्य करार करण्यात आले. आस्थापनांमधील  इंटर्नशिप, औद्योगिक भेटी, उद्योजकांच्या मुलाखती, नोकरीच्या संधी, विद्यार्थी प्रशिक्षण आदी मुद्यांवर विद्यार्थ्यांना आस्थापनांकडून सर्वोतोपरी मदत करण्याचे (Talegaon Dabhade) आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.