Pimpri : आयुक्तालयाला जे जे हवे ते देणार – सुबोधकुमार जयस्वाल

एमपीसी न्यूज – आयुक्तलयाच्या अडचणींवर जातीने लक्ष देणार आहे. अडचणीतही आयुक्तालय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे याचा आनंद आहे. सध्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित आहे. मात्र, निवडणूक संपताच आयुक्तालयाला आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि वाहने तसेच जे हवे ते देण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी केली. मंगळवारी (दि.१६) त्यांनी आयुक्तालयाला भेट देऊन पाहणी केली तसेच आयुक्तांसोबत बैठक घेत समस्या जाणून घेतल्या. तसेच महासंचालक कार्यालयातून आयुक्तालयाला १४ मोटारी देण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन व अतिरिक्त आयुक्त रानडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जयस्वाल यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही माहिती दिली.

  • अपुऱ्या मनुष्यबळात चिंचवड ऑटो क्लस्टर येथील इमारतीमध्ये १५ ऑगस्ट २०१८ ला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित करण्यात आले. यापूर्वी ग्रामीण हद्दीत असणारे आळंदी, चाकण, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी हे पोलीस ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत वर्ग करण्यात आले तर चिखली पोलीस ठाणे नव्याने निर्माण करण्यात आले.

दरम्यान, आहे त्या मनुष्यबळावर आयुक्तालय कार्यान्वित केल्यानंतर अनेक अडचणी समोर येऊ लागल्या. आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी आहे त्या परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेची धुरा सांभाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि त्याचे सकारात्मक पडसादही दिसू लागले. मात्र नाकाबंदी, वाहतूक नियोजन, कवीव सिस्पॉन्स पथके, व इतर अनेक उपक्रमांमध्ये मनुष्यबळाअभावी त्यांचेही हात बांधले जात आहेत. दरम्यान आयुक्तालय प्रेमलोक पार्क येथील नव्या इमारतीमध्ये हलवण्यात आले. मात्र मनुष्यबळ, वाहने व इतर प्रश्न कायम होते.

  • या पार्श्वभूमीवर आयुक्त पद्मनाभन यांनी अनेकदा विविध स्तरावर पाठपुरावा केला. पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन तसेच तत्कालीन महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यासोबतही वेळोवेळी बैठक घेतल्या. दरम्यान नवीन महासंचालक जयस्वाल यांच्यासोबतही याबाबत अनेकदा चर्चा करण्यात आली होती. दरम्यान जयस्वाल यांनी मंगळवारी आयुक्तालयाला भेट देत आयुक्तालयाची पाहणी केली.

त्यानंतर एक तास चाललेल्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी सर्व लेखाजोखा महासंचालकांसमोर ठेवला. याबाबत सकारात्मक विचार करून लोकसभा निवडणूक संपताच मनुष्यबळ भरण्याची प्रक्रिया सुरु करणार आलस्याचे सांगितले. त्यानुसार आयुक्तालयाला आणखी १०० गाड्या तसेच सुमारे १२०० मनुष्यबळ मिळणार आहे. याबरोबरच जयस्वाल यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलिसिंग करण्याच्या सूचना दिल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.