Pimpri : स्त्री संतांनी स्त्री सबलीकरणाचा मार्ग दाखवला; दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात परिसंवादातील वक्त्यांचे मत

एमपीसी न्यूज – संत मुक्ताबाई ,जनाई, (Pimpri)संत सोयराबाई ,संत सखुबाई, कान्होपात्रा या स्त्री संतांना मानवी जीवनात महत्त्वाचे व मोलाचे स्थान आहे, स्त्री सबलीकरणाची बीजे त्यांनी रोवली, स्त्री सबलीकरणाचा मार्ग दाखवला, असे मत मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

पद्मश्री ना .धो .महानोर साहित्यनगरी नवीन देहू आळंदी रस्ता मोशी येथे आज(Pimpri)संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी स्त्रियांचे साहित्यातील योगदान या विषयावर इंदुमती जोंधळे, डॉ. अपर्णा महाजन, लता पाडेकर यांनी मते व्यक्त केली अध्यक्षस्थानी डॉ. संगीता बर्वे होत्या. समन्वयक म्हणून डॉ. सीमा काळभोर यांनी काम पाहिले. यावेळी अध्यक्ष संदीप तापकीर, संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, स्वागत अध्यक्ष गणेश सस्ते, समन्वयक व निमंत्रक अरुण बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना लता पाडेकर म्हणाल्या की, महानुभाव संप्रदाय, चक्रधर स्वामींच्या शिष्यांनी सर्वप्रथम स्त्री साहित्यात योगदान दिले. युरोपातही स्त्रियांना लिखाणास परवानगी नव्हती, गार्गी मैत्री यांचेही एक स्त्री साहित्यिक म्हणून उदाहरण आहे. संत मुक्ताबाई यांनी दूडूदुडू धावायच्या वयात भावानी आणलेलं रांधायचं काम केलं.

 

कोणावरही नाराज व्हायचं नाही असं ठरवूनही संत ज्ञानेश्वर हे अपमानित झाल्याने ताटी लावून बसले तेव्हा धाकटी मुक्ताई आदिशक्ती म्हणून पुढे आली आणि ‘योगी पावन मनाचा साही अपराध जगाचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ असे जबाबदारीने सांगते साहित्य निर्मितीत संत मुक्ताबाईने योगदान दिले नसते तर अनेक ग्रंथ पुढे लिहिले गेले नसते. मुक्ताबाईनी हरीपाठाचे 12 अभंग लिहिले, संत साहित्यात अहंकार नष्ट करण्याची ताकद आहे , म्हणूनच संत ज्ञानदेव, निवृत्ती, चांगदेव यांना मुक्ताबाईने जीवनाच्या गर्तेतून बाहेर काढले. ताटीचे अभंग आणि हरिपाठ अभंग असे कितीतरी मोठे योगदान मुक्ताईचे आहे.

 

Sangvi : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने तरुणाची 18 लाखांची फसवणूक

संत जनाबाई ‘स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास’ असे सांगते स्त्री सबलीकरणासाठी ही ओवी खूप महत्त्वाची आहे. संत चोखामेळा यांना वेशी बाहेर नामस्मरण करावे लागले. संत सोयराबाई अवघा आनंद एक झाला रंगी रंगला श्रीरंग असा विचार सांगते. देहासी विटाळ म्हणती विटाळ विटाळा वाचूनी उत्पत्तीचे कसे निर्माण असा प्रश्न करून विटाळाला अपवित्र का म्हणावे, असा विचार संत सोयराबाईने तेराव्या शतकात मांडला. संत बहिणाबाई यांनी संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे सांगितले. संत मुक्ताबाई, संत जनाई ,संत सोयराबाई ,संत सखुबाई ,संत कान्होपात्रा यांना मानवी जीवनात मोलाचे स्थान आहे असे त्यांनी सांगितले

डॉ. अपर्णा महाजन म्हणाल्या की, स्त्री सबलीकरणाची बीजे भूतकाळातील स्त्री संतांनी रोवली व स्त्री सबलीकरणाचा मार्ग दाखवला. दीडशे वर्षांपूर्वी ताराबाई शिंदे यांनी 48 पानाचा निबंध लिहिला, मंगला आठलेकर यांनी ही स्त्री पुरुष तुलना असा ग्रंथ लिहिला त्याकाळी स्त्री हे स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे, यावर कोणाचा विश्वास नव्हता. पुरुषसत्ताक पद्धती होती, पुरुषाला त्याची पत्नी मरण पावल्यास दुसरा विवाह करता येत होता, मात्र स्त्रियांना करता येत नव्हता. स्त्रिया जसे शिक्षण घेत गेल्या तसतसे त्यांना स्वतःची बलस्थाने कळाली. केवळ फॅशनेबल आणि देखणं म्हणजे आधुनिकता नव्हे, तर व्यक्तीमहत्त्वातून ते दिसले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

इंदुमती जोंधळे म्हणाल्या की, प्रत्येक स्त्रीचे स्वतःचे आयुष्य असतं, स्त्रियांनी आपल्या मनातल्या वेदना अभंग आणि ओव्यांमधून बोलून दाखवल्या, सावित्रीला उभे करण्याचे काम ज्योतिबांनी केले पण प्रत्येकीला ज्योतिबा मिळेलच असे नाही, संत कान्होपात्रा यांनी धावी विठ्ठला म्हणत विठ्ठलाला हाक मारली ,मंगळवेढ्यात आज तिचे मंदिर आहे

डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या की एखादा विचार मनाला पटो अथवा न पटो लोलकाप्रमाणे तयार करावे लागते. घुसमटीतून, जगण्यातून बाहेर निघून स्त्रियांनी आपली व्यथा साहित्यातून मांडले पाहिजे, स्त्रियांच्या साहित्याला दुय्यम मानले जाते, यांची अक्कल चुल व मुलपुरतीच या पुरुषी अहंकारास तोंड देत मनाचा आविष्कार व्यक्त करायचा आहे, असे त्या म्हणाल्या. वैचारिक परिपक्वतेसाठी स्त्री व पुरुषांवर संस्काराची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

डॉ. सीमा काळभोर यांनी सूत्रसंचालन केले.

यानंतर सहाव्या सत्रात सोपान खुडे यांची मुलाखत संदीप तापकीर यांनी घेतली. मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले या संदीप तापकीर लिखित व विश्वकर्मा पब्लिकेशन्स निर्मित पुस्तकाचे प्रकाशन इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत रघुजी राजे आंग्रे यांच्या हस्ते झाले यावेळी विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी , उपस्थित होते .सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.