Pimpri : बोलण्यास नकार दिला म्हणून पिस्टल रोखून तरुणाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या वादातून बोलायला आलेल्या ( Pimpri ) आरोपीला तरुणाने बोलण्यास नकार दिला या रागातून आरोपीने थेट पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.28) रात्री पिंपरी येथे घडला आहे.

याप्रकरणी रोहित भगवान वाघमारे (वय 29 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी जतीन बिपिन टाक (वय 30)  सलमान शेख (वय 31) जुनेद शेख (वय 19)  कृष्णा उर्फ बॉक्सर बाळू पारधे (वय 25)  सर्व राहणार पिंपरी यांच्यावर खूनाचा प्रयत्न व बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 Pune : पुण्यात यंदा एकूण 6 लाख 18 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांचे जुने भांडण झाले होते या भांडणातूनच जितीन व त्याचे साथीदार फिर्यादी यांच्या घरी आले व त्यांनी फिर्यादीला बोलायचे आहे असे सांगितले.

फिर्यादी यांनी त्यास नकार देऊन ते त्यांच्या घरी गेले असता आरोपींनी त्यांना घराबाहेर उडत आणून पिस्तूल सारखे शस्त्र रोखून जीवे मारण्याची धमकी दिली व हाताने मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली.

यात फिर्यादी जखमी झाले यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत ( Pimpri ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.