Pimpri : स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याने 75 रोपांचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान देशभर राबविले जात असून देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून शहरातील विविध ठिकाणी ‘‘वसुधा वंदन’’ म्हणून देशी प्रजातींच्या 75 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

Pimpri : पोलिस आयुक्तांचे ‘राष्ट्रपती पदक’ शहरासाठी अभिमानास्पद!

दुर्गा टेकडी, निगडी येथील वृक्षारोपण मोहिमेत लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतला होता. आमदार उमा खापरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, माजी नगरसेवक राजू दुर्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक उद्यान अधिक्षक मंजुषा हिंगे, राजेश वसावे, सामाजिक कार्यकर्ते रमेश सरदेसाई, हिरामण भुजबळ, सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी कदम, राधिका बोर्वीकर, कोमल शिंदे, मनिषा शिंदे तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन येथे तसेच मोशी प्राधिकरण येथील पेठ क्रमांक चार मधील साईनाथ हॉस्पिटलच्या मागील उद्यानातही 75 देशी रोपांच्या वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.

पिंपळे सौदागर येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्य निर्मला कुटे, आरती चौंधे, क्षेत्रीय अधिकारी किरणकुमार मोरे, सहाय्यक आरोग्याधिकारी महेश आढाव, सहाय्यक उद्यान निरिक्षक गोपाळ खैरे, अनिल गायकवाड, दत्तात्रय आढळे तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते तर मोशी प्राधिकरण पेठ क्रमांक चार येथील कार्यक्रमास उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, सहाय्यक उद्यान निरिक्षक भानुदास तापकीर उपस्थित होते.

https://youtube.com/shorts/_5tMg3S8Qqg?feature=share

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.