Pune News : PMPML कडून मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन नवीन बसमार्ग सुरू

PMPML launches new bus route from Market Yard to Kasarwadi Railway Station.

एमपीसी न्यूज – pmpl कडून मार्ग क्रमांक 11अ मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन हा नवीन बसमार्ग आजपासून (मंगळवार, दि. 13) सुरू करण्यात आला. तसेच मार्ग क्र. 148 अ भोसरी ते भेकराईनगर या मार्गात बदल करून ही बससेवा देखील मार्गे कासारवाडी रेल्वे स्टेशन आजपासून सुरू करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका व स्थायी समिती सदस्या आशाताई शेंडगे यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, समन्वयक अधिकारी तथा पिंपरी आगार व्यवस्थापक संतोष माने, भोसरी आगार व्यवस्थापक रमेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संजय शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्रमांक 11अ मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन या बससेवेचा मार्ग मार्केट यार्ड-स्वारगेट-अप्पा बळवंत चौक- मनपा- शिवाजीनगर-मुळा रोड-खडकी बाजार- बोपोडी- दापोडी-पिंपळे गुरव-सृष्टी चौक-कासारवाडी रेल्वे स्टेशन असा असणार आहे.

मार्ग क्र. 148 अ भोसरी ते भेकराईनगर या बससेवेच्या मार्गात बदल करून ही बससेवा आजपासून भोसरी-लांडेवाडी-एमआयडीसी-भोसरी पोलीस चौकी-नाशिक फाटा-कासारवाडी रेल्वे स्टेशन-सृष्टी चौक-पिंपळे गुरव-दापोडी-बोपोडी-खडकी बाजार-सादलबाबा-येरवडा-बंड गार्डन-पुणे स्टेशन-वेस्ट एंड-पुल गेट- फातिमानगर- वैदूवाडी- मगरपट्टा कॉर्नर- हडपसर- एनआयबीएम-भेकराईनगर या मार्गाने जाईल.

मार्ग क्रमांक 11अ मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन हि बससेवा सध्या दर सव्वा तासाने उपलब्ध आहे. तर  मार्ग क्र. 148 अ भोसरी ते भेकराईनगर ही बससेवा दर 40 मिनिटांनी उपलब्ध आहे. प्रवाशी प्रतिसादानुसार या मार्गावर आणखी बसेस वाढवण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.