Dehugaon : देहूगावच्या नगराध्यक्षपदासाठी पूजा दिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज : श्रीक्षेत्र देहूगावच्या नगराध्यक्षपदासाठी (Dehugaon) शुक्रवारी (ता. 24) होणाऱ्या निवडणुकीसाठी पूजा दिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचे नगराध्यक्ष पद हे निश्चित मानले जाते.

श्रीक्षेत्र देहूगावचा नगराध्यक्ष स्मिता चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर शुक्रवारी निवडणूक होणार आहे.  देहूचे नगराध्यक्षपदी अनुसूचित जाती महिलासाठी राखीव आहे. सध्या देहूगाव नगरपंचायत मध्ये चव्हाण व दिवटे या महिला अनुसुचित जाती प्रवर्गातून निवडून आल्या आहेत.

Dr. Amol Kolhe : साहित्यिकांनी समाजाला आरसा दाखवला पाहिजे – डॉ. अमोल कोल्हे

यापैकी चव्हाण यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. यामुळे या जागेसाठी प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका पूजा दिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पूजा दिवटे यांना योगेश काळोखे हे सूचक तर प्रवीण काळोखे हे अनुमोदक आहे.

यावेळी पूजा दिवटे म्हणाल्या, की आमदार सुनील शेळके हे माझ्यासाठी दैवत असून त्यांच्या सूचनेनुसार मी हा उमेदवारी अर्ज (Dehugaon) दाखल केला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र देहूचा विकास करण्याचा माझा मनोदय असून मी त्या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्नशील असणार आहे.

हे काम करत असताना देहूतील माझ्या सर्व सहकारी नगरसेविका व नगरसेवकांना बरोबर घेऊन एक विचाराने काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.