PCMC : वायू प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एकाच दिवसात 2 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – वायू प्रदूषण करणा-यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC ) कारवाईचा बडगा उगारला आहे. 22 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी वायू प्रदूषण नियंत्रण पथकाने केलेल्या कारवाईत 2 लाख 17 हजार 753 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अ प्रभागातील वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने हॉटेल आणि बेकरी व्यवसायांकडून 10 हजार रूपये तर इतर ठिकाणी केलेल्या कारवाईत 8 हजार 593 रुपये असा एकूण मिळून 18 हजार 593 रुपये दंड वसूल करण्यात आला. ब प्रभागामार्फत 41 हजार 160 रुपये दंड वसुल करण्यात आला असून 7 ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने केलेल्या पाहणीत 2 ठिकाणी वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने नोटीस बजावण्यात आली आहे.

क प्रभागाच्या पथकाच्या वतीने 10 ठिकाणांना भेट देण्यात आली. त्यातील 3 ठिकाणी निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून एकूण 15 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. इ प्रभागाच्या वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने एकूण 10 हजार दंड वसूल करण्यात आला. पथकाने 3 ठिकाणांना नोटीस बजावली असून 2 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Dehugaon : देहूगावच्या नगराध्यक्षपदासाठी पूजा दिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

फ प्रभागामार्फत एकूण 35 ठिकाणांची पाहणी करण्यात आली. निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी 9 जणांवर कारवाई करण्यात (PCMC) आली. 1 लाख 25 हजार रुपये दंड वसुली करण्यात आली आहे.

ग प्रभागाच्या वतीने काल एकूण 3 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आणि 15 ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्यातील 6 ठिकाणी निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ह प्रभाग वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने एकूण 5 हजार रुपये दंड वसुली करण्यात आली. पथकाने 4 ठिकाणी पाहणी केली आणि एका ठिकाणी निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.