Pune : बुधवारपासून रेस्टॉरंट ऑन व्हील्सला सुरुवात

एमपीसी न्यूज – रेल्वे प्रशासनाने 2020 पासून ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स’ ही संकल्पना(Pune) राबविण्यास सुरुवात केली असून पुणे स्थानकावर ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहनतळात रेल्वेच्या डब्यात उपाहारगृह उभारण्यात आले आहे. हे उपाहारगृह बुधवारपासून (दि.22) सुरू करण्यात आले.

यात रेल्वेच्या जुन्या डब्यांचे उपाहारगृहांमध्ये रुपांतर करण्यात आले. देशभरात(Pune) अनेक स्थानकांच्या आवारात ही उपाहारगृहे सुरू करण्यात आली. देशात पहिले अशा स्वरुपाचे उपाहारगृह पश्चिम बंगालमधील असनसोल स्थानकावर उभे राहिले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मागील वर्षी डिसेंबर महिन्यात चिंचवड स्थानकावर हा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर पुणे स्थानकावर हे उपाहारगृह आता सुरू झाले आहे.

Dehugaon : देहूगावच्या नगराध्यक्षपदासाठी पूजा दिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

या उपाहारगृहाचे उद्घाटन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्यासह रेल्वेचे इतर अधिकारी आणि हल्दीरामचे संचालक नीरज अगरवाल यांच्या उपस्थितीत झाले. आगामी काळात आकुर्डी, बारामती आणि मिरज स्थानकांवरही अशा स्वरुपाचे उपाहारगृह सुरू होणार आहे.

रेल्वेकडून रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स चालविण्यास देण्यासाठी निविदा काढली जाते. पुणे स्थानकावरील या उपाहारगृहाचे कंत्राट हल्दीराम या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीला पाच वर्षांसाठी हे कंत्राट मिळाले. त्यातून रेल्वेला वर्षाला 60 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल.

रेल्वेच्या डब्याचे उपाहारगृहामध्ये रुपांतर केले, लांबी सुमारे 24 मीटर आणि रुंदी 3.25 मीटर, रेल्वेचा जुना डबा वापरात आणून त्याचा वापर,उपाहारगृहा ची आसनक्षमता 40, उपाहारगृह 24 तास खुले असणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.