Pimpri : झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला कारची धडक; दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – जुना पुणे मुंबई महामार्गावर हाफकिन कंपनीच्या (Pimpri) गेट समोर झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी घडली.

विठ्ठल लक्ष्मण देवकर (वय 30, रा. स्वारगेट, पुणे), केतन शिवाजी जाधव (वय 32, रा. दांडेकर पूल, पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

PCMC : वायू प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एकाच दिवसात 2 लाखांचा दंड वसूल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास टँकर चालक नवनाथ जेरीथोर हे टँकरने (एमएच 12/डीजी 7027) रत्याच्या बाजूला असलेल्या झाडाला पाणी घालत होते. त्यावेळी जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून कार (एमएच 14/डीटी 4707) वेगात आली. कारमध्ये चारजण होते. भरधाव कारने टँकरला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले.

अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri) कार चालक ईश्वर रामचंद्र कराळे (वय 32, रा. रुपीनगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.