Kalewadi : हनुमान जयंती निमित्त काळेवाडीत मिरवणूक

एमपीसी न्यूज – हनुमान जयंती निमित्त बगाडाची शेकडो (Kalewadi) वर्षांची परंपरा काळेवाडी आणि थेरगाव मधील ग्रामस्थ आजही पाळत आहेत. यावर्षी हनुमान जयंती दिवशी काळेवाडी मधील नढे पाटील परिवार आणि ग्रामस्थांनी बगाड मिरवणूक काढली.

सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मिरवणूक काळेवाडी येथील मारुती मंदिर (म्हातारबाबा मंदिर) येथून सुरु झाली. म्हतारबाबा मंदिरातून थेरगाव येथील बापुजी बुवा मंदिरात मिरवणूक येते. त्यानंतर ज्योतिबा पादुका पूजन करून शासन काठीची भेट होते. त्यानंतर तळी भंडाराचा कार्यक्रम होतो.

Pune : बावधन येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

काळेवाडी आणि थेरगाव मधील ग्रामस्थांनी शेकडो वर्षांपासून ही परंपरा जपली आहे. पिढीदरपिढी सुरु असलेले रितीरिवाज पुढील पिढीकडे दिले जात आहेत. (Kalewadi) त्यामुळे हा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असतो. यामध्ये सर्व वयोगटातील भाविक भक्त सहभागी होतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.