Pune : बावधन येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज –  टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. (Pune) ही घटना शनिवारी (दि. 8) सकाळी चांदणी चौकात बावधन येथे घडली.

सागर सदाशिव म्हसुरकर (वय 38, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 12/एसएफ 1036 क्रमांकाच्या टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : हनुमान जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी होणार साजरा

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर हे त्यांच्या दुचाकीवरून बावधन मार्गे खराडी येथे जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. (Pune) त्यात फिर्यादी जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.