Talegaon Dabhade : हनुमान जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी होणार साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील श्री हनुमान जयंती सार्वजनिक उत्सव विविध धार्मिक, मनोरंजनाच्या कार्याक्रमाव्दारे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.(Talegaon Dabhade) हा उत्सव सोमवार (दि. 10) पासून सुरु होणार आहे. अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष शुभम चिखले यांनी दिली.

यामध्ये उत्सवाच्या दिवशी (दि.10) रोजी सकाळी पुजा आणि अभिषेक मान्यवराच्या हस्ते होऊन उत्सवाच्या कार्याला प्रारंभ होईल. यामध्ये दुपारी भजन आणि महाप्रसादाचे वाटप आयोजन केले आहे. सायंकाळी विविध वाद्यांच्या निनादात पालखीची ग्रामप्रदक्षिणा होईल.रात्री येथील एसटी स्टँडच्या मैदानावर मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे.

Hinjawadi : चांगले शिक्षण व चांगले संस्कार आपल्याकडून कोणीही घेऊ शकत नाही – सुप्रिया सुळे

मंगळवारी (ता.11) रात्री एसटी स्टँडच्या मैदानावर राधा पाटील मुंबईकर यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. श्री हनुमान उत्सव समितीचे अध्यक्ष शुभम चिखले, कार्याध्यक्ष अविनाश मोहीते, (Talegaon Dabhade) राहुल चाबुकस्वार,वैभव विटे,उपाध्यक्ष विश्वनाथ कांबळे, ओंकार शिंदे,सचिव उत्तम ओसवाल, अशोक म्हाळसकर,खजिनदार अशोक ओसवाल आदींनी उत्सवाचे नियोजन केले असून या उत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पदाधिकारी यांनी ग्रामस्त व नागरिकांना केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.