Pune : एसएनबीपीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

एमपीसी न्यूज : यजमान एसएनबीपी अकादमी संघासह गतविजेते (Pune) शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी), स्पोर्ट्स होस्टेल झांसी या संघांनी एसएनबीपी अखिल भारतीय स्तरावरील 16 वर्षांखालील मुलांच्या हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेतून भोंगिर अकादमी तेलंगणा (ई गट), आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी (एफ गट), जय हॉकी अकादमी (एच गट) या संघांनी देखिल आपली आगेकूच कायम राखताना अखेरच्या आठ संघात स्थान मिळविले.

ई गटात यजमान एसएनबीरी संघाला अखेरच्या सामन्या नवाल टाटा अकादमी संघाने पुढे चाल दिली. यामुळे यजमान संघ गटात अव्वल स्थानावर राहिला.

एसजीपीसी संघाने रिजनल डेव्हलपमेंट सेंटर संघाचा 5-0 असा पराभव करून क गटातून आघाडी घेतली. कर्णधार हरमनबीर सिंगने खाते उघडल्यावर गुरप्रीत सिंगने दोन, तर गोयलप्रीत आणि हरजित सिंगने प्रत्येकी एक गोल करत संघाचा विजय साकारला.

ग गटातून अमनदीपने नोंदवलेल्या चार गोलच्या जोरावर राऊंड ग्लास अकादमीने सुखजीवन स्पोर्ट्स अकादमी संघावर 10-2 असा विजय मिळविला. जसमीत सिंग, इंदरजीत सिंग, दिपकप्रीत सिंग, सॅम्युएल, साजन राजभार, मनिष कुमार यांनी अन्य गोल केले. सुखजीवनकडून कुणाल राजभार आणि आकाश राजभार यांनी गोल केले.

ब गटातून स्पोर्ट्स हॉस्टेल संघाने इनफ्लिक्ट टाटा स्टिल फौंडेशन संघाचा एकतर्फी लढतीत 10-0 असा विजय मिळविला. प्रल्हाद पांडेने तीन, तर विवेक यादव, अखिलेश यादव यांनी प्रत्येकी दोन, तर करण धनुक आणि शिवमने एकेक गोल केला.

एसईसोसायटीच्या एसएनबीपी संस्था समूहाच्या वतीने या स्पर्धेचे (Pune) आयोजन करण्यात आले असून, हॉकी इंडिया आि हॉकी महाराष्ट्रची या स्पर्धेला मान्यता आहे.

निकाल –
इ गट एसएनबीपी अकादमी वि.वि. नवाल टाटा अकादमी पुढे चाल

ग गट – रऊंड ग्लास अकादमी 10 (जसमित सिंग 18वे मिनिट, इंदरजित सिंग 21 वे मिनिट, दीपकप्रीत सिंग 22 वे मिनिट, अमनदीप सिंग 25, 29, 45, 58 वे मिनिट, सॅम्युएल 38 वे मिनिट, साजन राजभार 51 वे मिनिट, मनिष कुमार 54वे मिनिट) वि.वि. सुखजीवन स्पोर्ट्स अकादमी 2 (कुणाल राजभार 43वे मिनिट, आकाश राजभार 56वे मिनिट)

ह गट – जय हॉकी अकादमी वि.वि. सेल हॉकी अकादमी पुढे चाल

क गट – एसजीपीसी अमृतसर 5 (हरमनबीरसिंग 11 वे मिनिट, गुरप्रीत सिंग 18, 29 वे मिनिट., गोयलप्रीत सिंग 52 वे मिनिट, हरजित सिंग 58 वे मिनिट) वि.वि. रिजनल डेव्हलपमेंट फौंडेशन 0

ब गट – स्पोर्ट्स होस्टेल झांसी, 10 (प्रल्हाद पांडे 10, 17, 40 वे मिनिट, शुभंकर सोनकर 13 वे मिनिट, विवेक यादव 18, 19वे मिनिट, अखिलेश यादव 20, 27 वे मिनिट, करण धनुक 25 वे मिनिट, शिवम 38 वे मिनिट) वि.वि. टाटा स्टिल फौंडेशन 0 मध्यंतर 8-0

फ गट – आर्मी स्पोर्टस कंपनी 4 (नितेश शर्मा 10, 35 वे मिनिट, समीर 17, 60वे मिनिट)वि.वि. फ्लिकर ब्रदर्स 2 (नितिन 50, मलक सिंग 56वे मिनिट)

ई गट – भोंगिर अकादमी तेलंगणा 4 (शिवा कनुजिया 17, 20, 40वे मिनिट, हरिष पटेल 44वे मिनिट) वि.वि. हॉकी नाशिक 3 (अथर्व गुंजाळ 6वे मिनिट, सुबोध जाधव 15वे , 41वे मिनिट)

गट ड – ऑलिम्पियन भास्करन हॉकी अकादमी वि.वि. नवाल टाटा हॉकी अकादमी पुढे चाल

Talegaon Dabhade : इंद्रायणी डी फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची रुग्णालयास भेट
————-
उपांत्यपूर्व फेरी गाठलेले संघ –

गट अ ध्यानचंद अकादमी; गट ब: स्पोर्ट्स हॉस्टेल झाशी; गट क : एसजीपीसी अमृतसर; गट ड : एसएनबीपी अकादमी; गट ई ः भोंगीर अकादमी तेलंगणा; गट फ : आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी; गट ग : गोल ग्लास अकादमी; गट ह : जय हॉकी अकादमी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.