Pune : वारकरी भक्तांच्या स्वागतासाठी सलग 12 तास अखंड कीर्तनमाला

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही वारकरी भक्तांच्या स्वागतासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को-आॅप. बँकेतर्फे सलग 12 तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.

वारकरी सांप्रदायाचा भगवा पताका आसमंती उंचवत, ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरला पायी चालत जाण्याची परंपरा वारकरी भक्तांनी अखंड चालू ठेवली आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात संतांच्या पालख्या देहू-आळंदी येथून प्रस्थान करतात आणि पुण्यात मुक्कामासाठी थांबतात. वारकरींच्या स्वागतासाठी पुणेकरांची जयत्त तयारी सुरू असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही वारकरी भक्तांच्या स्वागतासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को-आॅप. बँकेतर्फे सलग 12 तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन केले आहे

रविवारी (दि. 8) जुलै रोजी लालमहाल येथे वै. ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी स्मरणार्थ भक्ती शक्ती एकात्म नाम सोहळा अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत कीर्तन होणार आहे. नारदीय कीर्तनमालेचे उदघाटन सकाळी 8 वाजता होणार असून कीर्तनमालेत ह.भ.प.न.चिं.अपामार्जने यांच्या कीर्तनाने होणार आहे. ह.भ.प.उज्वला वेदपाठक, ह.भ.प. गायत्री देशमुख, ह.भ.प. ज्योत्स्ना गाडगीळ, ह.भ.प. मृणाल जोशी, ह.भ.प मंदार गोखले, ह.भ.प.कृष्णा मालकर, ह.भ.प. प्रा, संगीता मावळे आदी कीर्तनमालेत सहभागी होणार आहे. वारकरी भक्तांच्या स्वागतासाठी कीर्तनमाला घेण्यात येत असून दिंडीप्रमुखांसह वारकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.