Pune : संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 407 श्रद्धाळूंनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – पुणे झोन (Pune) मधील रुपीनगर शाखेच्या तर्फे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन 3 सप्टेंबर करण्यात आले होते. ज्यामध्ये 407 रक्तदान केले. वाय.सी.एम.रक्तपेढी आणि संत निरंकारी रक्तपेढीच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 407 युनिट रक्त संकलन करण्यात आले.

या शिबिराचे उदघाटन आदरणीय ताराचंद करमचंदानी जी (पुणे झोन प्रमुख) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला आमदार आण्णा बनसोडे यांनी भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले.

संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर 1986 मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील 36 वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत बारा लाखाहून अधिक युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.


संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी (Pune) सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते.

यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या 15 दिवसांपासून मिशनच्या स्वयंसेवकांनी रूपीनगर परिसरामध्ये रक्तदानाची जनजागृती केली, रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक भास्कर म्हस्के जी यांच्या मार्गदर्शनाखाली निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्याचे आभार रुपीनगर शाखा प्रमुख प्रल्हाद गोगरकर जी यांनी केले.

Pune : देशातील पहिला तृतीयपंथीयांचा दहिहंडी संघ !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87e091b42f191150',t:'MTcxNDc0MjY0NS44OTgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();