Pune : विविध नविनयपूर्ण उपक्रमांनी एनआयपीएम संस्थेचा 44 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पेर्सोनेल मॅनेजमेंट (NIPM ) चा 44 वा  वर्धापन दिन शुक्रवारी  (दि.15 ) रोजी पुणे विभागाच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पुण्यात ( Pune ) पूना क्लब येथे  आयोजित करण्यात आला होता .

 

यावेळी NIPM  पुणे विभागाचे अध्यक्ष कल्याण पवार  यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, NIPM  हि संस्था संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 25 हजार मनुष्यबळ विकास प्रतिनिधी असणारी एकमेव संस्था  आहे, तिची स्थापना 15 मार्च  1980 रोजी कलकत्ता येथे झाली असून नॅशनल इन्स्टिटयूट लेबर मॅनेजमेंट आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ पेर्सोनेल मॅनेजमेंट याचा उत्तम मिलाफ आहे.

 

 

कल्याण पवार यांनी NIPM पुणे संस्थेचे उद्देश, संस्थेचे उपक्रम आणि व्याप्ती यावर उपस्थितींना अवगत केले मागील वर्षभरात ऊद्योगधंदे  आणि शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा संक्षिप्त आढावा घेतला आणि पुढील वर्षभरासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रम बद्दल सविस्तर माहिती दिली.

 

Chinchwad : शाहू उद्यानाच्या पुनर्विकासाच्या कामात 1 कोटींचा भष्टाचार – मारुती भापकर

 

यावेळी मुला-मुलींसाठी तसेच महिला वर्गासाठी इन्स्टंट टॅटू आणि मेहेंदी काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  एकंदरीतच या वर्षाच्या वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमामुळे   सर्व स्थरावर चर्चेचा विषय राहिला. या कार्यक्रमासाठी विशेष करून पुणे विभागाचे यापूर्वीचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष . विश्वेश कुलकर्णी, डॉ. संतोष भावे, माणिकराव पाटील, अभिजित शहा,सुनील कोदे,  शशिकांत क़ुर्बेटी, उमेश जोशी,  सदाशिव पाटील, नरेंद्र पाटील राष्ट्रीय खजिनदार  अमृता तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल घोगरे साहेब, अतिरिक्त संचालक, फॅक्टरी आणि बॉयलर ऑफिस पुणे,  संदीप लोंढे, उपसंचालक  संस्थेतील आजीवन सभासद , त्यांच्या पाल्यांचा तसेच परिवारातील सदस्यांचा   शैक्षणिय, सामाजिक, साहित्यिक तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी बाबत प्रत्येकाचा प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वर्धापन सोहळ्यासाठी नीपण चे सर्व आजीवन सदस्य कुटुंबियांसोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कार्यक्रमासाठी संस्थेचे, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम. एच. राजा, यांनी ऑनलाईन पद्धतीने सर्व उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी नॅशनल ऑफिस कोलकाता यांनी चालू वर्षासाठी “ बॅक  टु बेसिक ” हि  विशेष थिम राष्ट्रीय स्तरावर ठेवण्यात आली होती. या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. आशिष तावकार यांनी  “ बॅक  टु बेसिक ” या विषयावर अवगत केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व उपस्थितांना करमणूक म्हणून अलबेला हा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. सर्व उपस्थितांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती वहिदा पठाण यांनी केले तर त्यांना विशेष सहकार्य श्रीमती कीर्ती धरवाडकर आणि मनीषा खोमणे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे चिटणिस  डॉ. अजित ठाकूर यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर संजय झोपे, प्रशांत क्षीरसागर, बाळासाहेब सोनवणे , सतीश पवार, पवन शर्मा , श्रेयस दाबके , किशोर केंचे , आणि सुहास आचार्य या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सूर्यदत्ता इन्स्टिटयूट मधील हॉटेल मॅनेजमेंट डि वाय पाटील मॅनेजमेंट च्या विध्यार्थ्यानी सक्रिय सहभाग घेऊन  अणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले अणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय असे एकूण 400 सदस्य उपस्थित होते. सर्व उपस्थितांनि शेवटी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला   तसेच  प्रत्येक कुटूंबासाठी एक  भेटवस्तू देण्यात आली .  आजपर्यंतचा सर्वात चांगला कार्यक्रम म्हणून सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले आणि संस्थेच्या पुढील ( Pune ) वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.